रस्त्यांची बातमी : जळगाव शहरातील ३१ रस्त्यांसाठी मक्तेदार बदलणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरात दहा रस्त्यांची कामे करण्यास मुक्तेदारांकडून होत असलेला विलंब आणि 31 रस्त्यांसाठी नवीन दराची मागणी. यामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडले आहेत. सहाजिकच नागरिकांचा रोष हा महानगरपालिका प्रशासनाला सहन करावा लागत आहे. यामुळे त्या कामाकरिता मक्तेदार बदलून कामाचे विभाजन करत 15 मक्तेदारांकडून काम करून घेण्याबाबत नगर विकास विभागाशी चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. रस्ते तयार करण्यासाठी कामे तातडीने करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे. शहरातील 41 रस्त्यांसाठी शासनाचा निधी प्राप्त आहे. त्यासाठी मक्तेदारही नियुक्त करण्यात आला आहे. मात्र दहा रस्त्यांचे कामे करण्यासाठी मक्तेदाराला महानगरपालिकेने लेखी पत्र देऊनही रस्त्यांची कामे होत नसल्यामुळे प्रशासनाने मक्तेदार बदलायचा निर्णय घेतला आहे. यावेळी मक्तेदार बदलाल्या बाबत नगरविकास विभागाशी चर्चा करण्यात आल्याचे समजले.
तर दुसरीकडे नगर विकास विभागाने महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामावर अंतिम मंजुरी द्यायला अडथळा तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यांच्या कामासाठी एकाच मक्तेदाराला नियुक्त न करता कामाचे विभाजन करण्यात यावे. असे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. यासाठी पंधरा वेगवेगळे मक्तेदार नियुक्त करून त्यांच्याकडून कामे करण्यात येतील. यामुळे ही कामे वेगाने होतील असेही महानगरपालिकेचे म्हणने आहे.