---Advertisement---
शैक्षणिक

ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारात दृष्टी गमावली, तरी ‘बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज’ मध्ये मिळवली प्रथम श्रेणी!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । जिद्द असली तर कोणत्याही संकटावर मात करून यशस्वी होणे शक्य असते. हे फक्त म्हणण्यापुरतेच नाही तर कृतीतही उतरवले, शिरपूरच्या ऋषिकेश जगदाळे या तरुणाने. ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजाराने ग्रासलेले असताना त्याची दृष्टी हिरावली गेली. तरीही हार न मानता ऋषिकेशने जिद्द सोडली नाही. ‘बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज’ मध्ये पदवी घेऊन प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले.

busines jpg webp webp

ऋषिकेश जगदाळे हा शिरपूरचा रहिवासी आहे. शिरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल पांडुरंग जगदाळे यांचा हा लहान मुलगा आहे. ऋषिकेशला अचानक डोकेदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान ब्रेन ट्युमर असल्याचे समोर आले. ब्रेन ट्युमर सारखा गंभीर आजराचे निदान झाल्यानंतर देखील ऋषिकेशने शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द ठेवली.

---Advertisement---

आपल्या निर्धारावर ठाम राहून शिरपूर मधील आयएमआरडी महाविद्यालयात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीजसाठी प्रवेश घेतला. प्रथम वर्षाला अधिक त्रास उदभवू लागला. प्रथम वर्षाचे पेपर सुरु असताना दृष्टी धूसर होऊ लागली. कोरोनाच्या काळात दुखणे अधिक वाढले. तेव्हा, त्याच्यावर मुंबईत उपचार सुरु करण्यात आले. त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करत असताना ऋषिकेशची दृष्टी कायमची हिरावली गेली.

२०१८ ते २०२३ या पाच वर्षाच्या काळात त्याच्यावर वेळोवेळी रेडिएशन थेरपी सुरु होत्या. तरीही हिंमत न हरता त्याने अभ्यास सुरु ठेवला. शेवटी, आता नुकताच शुक्रवारी बिझनेस मॅनेजमेंट स्टडीजचा निकाल जाहीर झाला. त्यात ऋषिकेशने प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे.

“ब्रेन ट्युमर सारखा आजार असल्याचे समजल्यावर देखील ऋषिकेशने आजिबात जिद्द सोडली नाही. तो अभ्यास करत राहिला. कुटुंबासोबत शिक्षकांचेही अमूल्य मार्गदर्शन त्याच्या सोबत होते. त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याने हे यश संपादन केल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे.”, असे ऋषिकेशचे वडील यांनी वक्तव्य केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---