⁠ 
मंगळवार, मार्च 19, 2024

पाळधीत दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ मार्च २०२३ | जळगाव शहरापासून जवळच असलेल्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता दोन गटात वाद झाला. वादाचे पर्यावरण हाणामारीतून दंगल उसळली. दगडफेकीत तीन चारचाकीचे नुकसान झाले असून पोलिसांची जीप देखील फोडण्यात आली आहे.

riot-in-paladhi-jalgaon-news
पाळधीत दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच 1

जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील तरुण पायी दिंडी घेऊन श्री सप्तशृंगी गड वणी येथे निघाले होते. पाळधी गावात दिंडी पोहचताच वाद्य वाजविण्यावरून काही वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दगडफेक झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यासह दोन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत झालेल्या दगडफेकीत तीन चारचाकी आणि एका पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, ऋषिकेश रावले, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह पोहचले आहेत. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक बोलाविले असून काही फिक्स पॉइंट नेमले आहेत. संशयितांची धरपकड सुरू असून गावात शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.