⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

भुसावळात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे घर फोडले ; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील आयान कॉलनी परिसरात सेवानिवृत्त मेल ड्रॉयव्हरचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २० रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील अयान कॉलनी परिसरात असद आली खान हे पत्नी, मुलगा वा मुलीसह राहत असून ते रेल्वेतील सेवानिवृत्त मेल ड्रॉयव्हर आहेत. दरम्यान गेल्या १६ मार्च पासून ते त्याचे मूळ गाव प्रतापगड (उत्तर प्रदेश) गेले आहेत. दरम्यान घराची देखभाल कारण्यासाठी शेख निजामोददीन यांच्यावर जबाबदारी देत त्याच्याकडे चावी देण्यात आली होती.  त्यानुसार दि. २० रोजी शेख निजामउददीन हे सकाळी १० वाजता असद आली खान यांच्या घराकडे गेले असता त्यांना घराच्या दरवाज्याचा कांडीकोयंडा तुटलेला दिसून येत घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलवित पोलिसांना माहिती दिली.

२० तोळे सोन, ५० तोळे चांदीसह रोकड लंपास

दरम्यान, चोरटयांनी घराच्या पुढच्या दरवाजाचे काडीकोयंडा तोडत घरात प्रवेश केल्या त्यानंतर त्यांनी बेडरूममधील कपाट उघडण्याचा प्रयत्न केला असता ते सहजा सहजी उघडता नसल्याने कपाटाचा दरवाजा वरून वाकवून कपात फोडत त्यातील २० तोळे सोना, ५० तोळे चांदी व ३० हजार रोख असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.  दरम्यान बेडरूम मधील सामान अस्तावेस्त करून चोरट्याने मागचा तारवाजा तोडून पाळ काढला.

सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळाताच साहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी भेट देत पाहणी केली. त्यानंतर जळगाव येथून डॉग स्कॉट व ठसे तंज्ञाना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ठसे घेतले आहे. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.