---Advertisement---
जळगाव शहर

सेवानिवृत्त अभियंता हिरामण चव्हाण यांनी दिला गरीब लेकरांना मदतीचा हात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । सेवानिवृत्त शाखा अभियंता हिरामण चव्हाण यांनी शिरसोली रस्त्यावरील गरीब वस्तीत दि.३१ मंगळवार रोजी ज्यांना चपला नाहीत जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करत फिरतात. अशा गरजु लेकरांना चपलां व बुटांचे वाटप केले. याचा साधारण ३० लेकरांनी लाभ झाला.

yawal 18

आजच्या या युगात अनेक लोक शासकीय सेवेत असल्यामुळे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर लाखो रूपये खर्च करतात. मात्र, ३७ वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले हिरामण चव्हाण यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या वायफळ खर्चाला फाटा देत गरीब व गरजू मुलांना चपलां व बुट भेट देऊन हा उपक्रम साजरा केला आहे. जळगावाचे तापमान हे साधारण चाळीस च्या वरती आहे. अश्या भर उन्हात गरीब लेकरं अनवाणी पायाने फिरतात. त्यामुळे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा न करता आपण गरीब मुलांना मदतीचा हात देण्याचा निश्यय चव्हाण यांनी केला. आणि सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांनी या गरजू मुलाना चप्पल, बुटांचे वाटप केले. यामुळे चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चपला भेटल्यावर मुलांच्या चेहेऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता. दरम्यान चव्हाण यांनी भविष्यात होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना असा सामाजिक उपक्रम साजरा करण्याचे आवाहन केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---