जिल्ह्यात होमिओपॅथिक कॉलेज मंजूर करवून आणल्या बद्दल गिरीश महाजनांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । जळगाव येथे शासकीय होमिओपॅथिक कॉलेज मंजूर करवून आणल्या बद्दल राज्याचे नेते, जामनेर तालुक्याचे आमदार माजी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना आमदार महाजन यांनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत हनुमान पावल्यामुळे या होमिओपॅथिक कॉलेजला मान्यता मिळाली असल्याचे प्रतिक्रिया यावेळी दिली.
संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.रितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.देवानंद कुलकर्णी, जिल्हा सहसचिव डॉ.मनोज विसपुते, चामुंडा माता होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ.समीर साकळीकर, उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल पाटील, जामनेर तालुका होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ शेळके, सचिव डॉ.योगेश इंगळे, खजिनदार डॉ.पवन पाटील, डॉ.एल. यु. जैन, डॉ.विकास कळसकर, डॉ.के. एम. जैन, डॉ.अविनाश कुरकुरे, डॉ.संदिप सरताळे, डॉ.योगेश सरताळे, डॉ.सागर पंडित, डॉ.प्रफुल्ल धांडे, सौ. डॉ.जयश्नी धांडे, डॉ.हर्षल बोहरा, डॉ.भुषण श्नीश्नीमाळ, डॉ.अमोल पाटील, तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि निमा संघटनेचे डॉ.संजीव पाटील उपस्थित होते…