⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रायसोनी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक महाविध्यालय व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७३ व्या प्रजासत्ताक दिन ललित पाटील या प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता, समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असा मौलिक संदेश डॉ. अग्रवाल यांनी दिला.

यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजास मानवंदना देत विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बिपासा पात्रा व प्रा. रफिक शेख यांनी केले तर यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह