जळगाव जिल्हाजळगाव शहर

गोदडीवाला परिसर युवा मंडळतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । सिंधी कॉलोनी गोदडीवाला परिसर युवा मंडळतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात शबिरा तडवी यांच्या हस्ते करण्यात आली. सेवा निवृत्त शिक्षकांचा व साफ सफाई कामगार अंजना वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर लहान मुलांनी देशभक्ती वर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर चेतनदास हॉस्पीटल यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लसीकरण कार्यक्रमास शबिरा तडवी व दिशा सुनिल शिंदे यांचे सहकार्य लाभले. ध्वजारोहणासाठी मुख्य अतिथी म्हणुन शबिरा तडवी, दयानंदजी केसवाणी, दयानंद विसराणी, चंद्रलाल खेटवाल, अशोक कुकरेजा, राजकुमारी गेही, टि.के.मोतीरामानी, डॉ. सत्यवान, ओमप्रकाश कौराणी व अंजना वानखडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक दयानंद विसराणी, कपिल लुल्ला यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतस्वरुप तलरेजा, चिराग गेही, यश मंधान, रिंकेश मकडिया, सुरज मंधान, कपिल मेहता, मयंक ओचानी, जतीन दुसेजा, साहिल ललवाणी, आदित्य कुकरेजा, आनंद तलरेजा, रोहीत कुकरेजा, पराग गेही व जतीन मंधान यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button