⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

रेल्वे प्रवास स्वस्त ! भुसावळहुन धावणाऱ्या ‘या’ ट्रेनच्या तिकिट दरात मोठी कपात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । भारतीय रेल्वेने पॅसेंजर रेल्वेंच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. या निर्णयानंतर भुसावळहुन धावणाऱ्या काही गाड्यांच्या तिकीट दरात कपात करण्यात आलीय. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पॅसेंजर ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घट आहे. यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये १० ते ३० रुपयांची घट झाले आहे. यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे द्यावे लागत होतं

दरम्यान, या निर्णयानंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नंदुरबार रेल्वेच्या तिकीट दरात कपात केली आहे. गाडी क्रमांक ०९०७८ भुसावळ -नंदुरबार ही भुसावळ येथून सकाळी ९ वाजेला सुटते. त्यांनतर ते जळगावातून सकाळी ९.३५ वाजता सुटते. नंदुरबारला ही गाडी दुपारी १.४० ला पोहोचते.

गाडी क्रमांक ०९०७७ नंदुरबार-भुसावळ ही गाडी नंदुरबारहून दुपारी २.३० ला सुटते. जळगावला सायंकाळी ६.४२ वाजता पोहोचते. या गाडीसाठी कोरोनापासून एक्सप्रेसचे दर आकारले होते. मात्र आता दर कमी झाल्याने भुसावळ ते नंदुरबार प्रवास आणखी स्वस्त होणार आहे. जळगाव ते अमळनेरचा रेल्वे प्रवास १५ रुपयात होणार आहे.