---Advertisement---
जळगाव शहर

बंडखोरांना पुन्हा तारीख पे तारीख, जळगावात अफवांना ऊत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये भाजप विरोधी बंडखोरी करत शिवसेनेच्या महापौरांना मतदान करणाऱ्या भाजपच्या १७ बंडखोर नगरसेवकांना नाशिक येथील विभागीय आयुक्तांनी पुढील सुनावणीसाठी १९ ऑगस्ट या तारखेला बोलावले आहे. दरम्यान, आज पुन्हा तारीख पे तारीखचे चित्र पाहायला मिळाले असून जळगावात बंडखोरांवर कारवाई झाल्याच्या अफवांना ऊत आला आहे.

kulbhushan patil

महापौर पदासाठी मार्च २०२१ मध्ये निवडणूक झाली तेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी नगरसेवकांनी भाजपसोबत बंडखोरी करत शिवसेनेसोबत हात मिळवनी केली होती. बंडखोरांविरोधात नाशिक व औरंगाबाद येथे दोन विविध ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर अद्याप कामकाज सुरु आहे. मंगळवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी विभागीय आयुक्तांनी सर्व बंडखोर नगरसेवकांना १९ ऑगस्ट ही नवीन तारीख दिली आहे. त्यामुळे महिनाभर सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.

---Advertisement---

राज्यातील ठाकरे सरकार गेल्यानंतर शिंदे सरकार विराजमान झालं आहे. राज्यातील सत्तापालटचा परिणाम जळगाव मनपावर होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु पुन्हा १९ तारीख आल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. मात्र दुसरीकडे संपूर्ण जळगाव शहरात ते नगरसेवक अपात्र झाले असल्याचे अफवा सुरू आहेत. सर्वत्र बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस आली असल्याच्या अफवा जळगाव शहरात सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी १९ ऑगस्ट तारीख दिली असल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---