⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | 10वी ते ग्रॅज्युएट पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. RCFL मध्ये बंपर रिक्त जागा, असा करा अर्ज

10वी ते ग्रॅज्युएट पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. RCFL मध्ये बंपर रिक्त जागा, असा करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RCFL Recruitment 2022 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL Ltd) मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. ऑपरेटर प्रशिक्षणार्थीच्या १३३ जागा आणि कनिष्ठ फायरमनच्या ४ जागा आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १४ मार्चपासून सुरू होणार असून २८ मार्चपर्यंत चालणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाइट rcfltd.com वर जाऊन करावा लागेल. नोटीसनुसार, RCFL मध्ये ऑपरेटर ट्रेनी पदांच्या भरतीसाठी एक वर्षाचे प्रशिक्षण असेल. या दरम्यान 9000 रुपये स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, ऑपरेटर ग्रेड-II या पदावर नियुक्ती केली जाईल.

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू –
12 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022

रिक्त जागा तपशील

१) ऑपरेटर केमिकल ट्रेनी – 133 पदे
२) कनिष्ठ फायरमन ग्रेड-3-पद

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता :

ऑपरेटर केमिकल ट्रेनी – किमान ५५% गुणांसह रसायनशास्त्रात B.Sc किंवा केमिकल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा. किंवा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
ज्युनियर फायरमन – सहा महिन्यांच्या अग्निशमन प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव.

वय श्रेणी
ऑपरेटर केमिकल ट्रेनी-
अनारक्षित श्रेणी आणि EWS – 29 वर्षे
SC आणि ST – 34 वर्षे
OBC- 32 वर्षे
कनिष्ठ फायरमन-
SC, ST- 34 वर्षे
OBC- 32 वर्षे

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन चाचणी
  • व्यापार चाचणी

पगार
ऑपरेटर केमिकल ट्रेनी – रु 22,000-60,000
ज्युनियर फायरमन – रु. 18,000-42,000

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.