जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । उद्या एप्रिल २०२२ महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मे महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर लवकर करून घ्या. जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने प्रसिद्ध केली असून मे महिन्यात बँका तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत.
पहिल्या आठवड्यात चार दिवस बँका बंद राहणार
मे महिन्याच्या सुरुवातीला सलग चार दिवस बँकांना सुट्टी असेल. राज्य आणि स्थानिक सणांच्या अनुषंगाने बँकांच्या सुट्या वेगवेगळ्या असतात. रिझर्व्ह बँकेकडून बँकेच्या सुट्ट्या चार आधारावर ठरवल्या जातात. सुट्ट्यांची यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांनुसार आहे. याशिवाय राष्ट्रीय सुट्ट्या आणि शनिवार-रविवारच्या सुट्याही कॅलेंडरमध्ये आहेत.
मे महिन्यात विविध झोनमधील एकूण ३१ दिवसांपैकी १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये बँकेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. सुट्ट्यांच्या संदर्भात, बँका आधीच ग्राहकांना विनंती करतात की त्यांनी संबंधित महिन्यातील सुट्ट्यांची आगाऊ काळजी घ्यावी. तुमच्या शहरात किंवा राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील हे ग्राहकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
मे मधील बँक सुट्ट्यांची यादी (मे 2022 मध्ये बँक सुट्ट्या)
१ मे २०२२: कामगार दिन / महाराष्ट्र दिन. देशभरातील बँका बंद. रविवारीही या दिवशी सुट्टी असेल.
२ मे २०२२: महर्षि परशुराम जयंती – अनेक राज्यांमध्ये सुट्टी
३ मे २०२२: ईद-उल-फित्र, बसव जयंती (कर्नाटक)
४ मे २०२२: ईद-उल-फित्र, (तेलंगणा)
९ मे २०२२: गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा
१४ मे 2022: दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी
१६ मे २०२२: बुध पौर्णिमा
२४ मे २०२२: काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम
२८ मे २०२२: 4थ्या शनिवारी बँकांना सुटी
मे 2022 मध्ये वीकेंड बँक सुट्ट्यांची यादी
1 मे 2022 : रविवार
8 मे 2022 : रविवार
१५ मे २०२२ : रविवार
22 मे 2022 : रविवार
29 मे 2022 : रविवार