⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

सोने-चांदीचा तोरा पुन्हा वाढला ; आता जळगावच्या सुवर्णनगरीत काय आहे भाव? पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । सध्या जागतिक घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आली असताना सोने आणि चांदीचा भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या सणावर खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरते की काय असे ग्राहकांना वाटू लागले आहे. Jalgaon Gold Silver Rate 8 May 2024

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६०० ते ७०० रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे चांदीचा दर १००० रुपयांनी वधारला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये सोन्याचा ६२ हजार ९०० रुपयावर असलेला दर ३१ मार्च २०२४ रोजी ६८ हजार ७०० तर २३ एप्रिल रोजी ७४ हजार २०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळ्यावर पोहोचला होता. चांदीने देखील गेल्या महिन्यात ८५००० पर्यंत मजल मारली होती.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसून आले. या पहिल्याच्या पहिल्या आठवड्यात सोने जवळपास १५०० रुपयांपर्यतची तर चांदीत किंचित घसरण दिसून आली. या आठवड्यात ६ मे रोजी सोने ३०० रुपयांनी वधारले. तर ७ मे रोजी पुन्हा ३०० रुपयांनी किंमती वधारल्या. यामुळे सध्या २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ७२३०० रुपयावर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर ७४,४६६ रुपयावर इतका आहे. दुसरीकडे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ८२००० रुपयावर आहे.