Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । तालुक्यतील निंभोरा येथील कृषी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार संरक्षण समिती चा सन्मान सोहळा संपन्न झाला.

तालुक्यातील निंभोरा बु येथे दिनांक १६/१०/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता नुकत्याच पत्रकार संरक्षण समिती रावेर ग्रामीण तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आलेली असून या नुतन रावेर तालुका ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती च्या सर्व कार्यकारिणी व सदस्य यांचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष निंभोरा येथील जेष्ठ समाजसेवक प्रल्हाद बोंडे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समिती चे जेष्ठ सल्लागार राजीव बोरसे हे होते. या सन्मान सोहळा कार्यक्रमात सर्व पत्रकारांना ट्राफी, नियुक्ती पत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार समितीचे ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज यांनी समितीचे ध्येय व धोरणे हे पटवून सांगितले व पत्रकारांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबतीत माहीती दिली. या सन्मान सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे, जेष्ठ सल्लागार राजीव दादा बोरसे, ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज, तालुका उपाध्यक्ष सुमित पाटील, युसुफ शहा, भिमराव कोचुरे, तालुका सचिव विजय एस अवसरमल व असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.