⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

रावेरला ‘राष्ट्रीय पोषण माह’ अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । कुपोषित बालकांच्या सर्वांगीण पोषणासाठी केंद्र सरकार तर्फे सुरु करण्यात आलेल्या केंद्रीय महिला व बालविकास विभागमार्फत “सही पोषण – देश रोशन” या योजनेंतर्गत “राष्ट्रीय पोषण माह” अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रावेर व भाजपा महिला आघाडी, रावेर यांचे मार्फत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थितीत भारताचे प्रधामंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा महिला आघाडी, रावेर यांच्यातर्फे “सदृढ बालक बालिका स्पर्धा” च्या बालकांना खासदार रक्षाताई खडसे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, किशोरवयीन मुली यांच्या मार्फत सादर करण्यात आलेल्या कलाकृतींचे व खेळांची यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह कि.मो.उ.सं.प्र सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, भरत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील सर, मा.पं.स.सभापती कविता कोळी, महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, पी.के.महाजन, वासुदेव नरवाड़े, जुम्मा तडवी, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, संदीप सावळे, हरीलाल कोळी, महेश पाटील, भारती पाटील, शुभम पाटील, यावल महिला आघाडी अध्यक्षा जयश्री चौधरी, गोमती बारेला, वैशाली झाल्टे आदी उपस्थित होते.