जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ ।कोरोना नियमांचं उल्लंघन करून छपून व्यवसायक करणाऱ्या रावेर शहरातील रुपम मॉल या कापड दुकानावर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यावेळी पथकाने कारवाई केली तेव्हा या दुकानात तब्बल १४३ जणांची उपस्थिती होती. त्यामुळे तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या उपस्थितीत दुकान सील करण्यात आले. तालुक्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली.

मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाने मंगळवारी शहरात कारवाई सुरू केली. त्यात शहरातील रुपम कापड मॉलमध्ये अनेक ग्राहक असल्याचा संशय आला. रुपम मॉलने नियमांचे उल्लंघन केले आहे. दुकानात तब्बल १४३ जण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने पर व्यक्ती १००० रुपये असा तब्बल १ लाख ४३ हजार रुपयाचा दंड दुकानदाराला ठोठावला आहे.
दरम्यान, शॉपिंग मॉल मध्ये जाण्यासाठी चोरटा मार्ग तयार करण्यात आला असल्याने अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी कोरोनाला आयते आमंत्रण देण्यासारखे असून सदरील ठीअक्न सुपर स्प्रेडर ठरत असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या आधी देखील मालकांवर दोन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा मॉल सील असेल. रावेर येथील रूपम मॉलला बाहेरून कुलूप असले तरी अात गर्दी होती.
दुकान मालकाची मुजोरी
पालिका व पोलिसांचे पथक कारवाई करत असताना दुकान मालक सुरेश ललवाणी यांचा मुलगा विक्की ललवाणी याने अरेरावी केली. ‘मै तो करोडपती है, मुझे इस धंदे की कोई जरूरत नही’ असे तो सांगत होता. तरीही पथकाने नियमानुसार रुपम मॉल सील केला. यानंतर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल.