जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । रावेर लोकसभा मतदारसंघात २२% मुस्लीम मतदार आहेत. मुस्लिम समाज काँग्रेसला नेहेमीच मदत करत आला आहे. अनेक वर्षापासून रावेर लोकसभा हा काँग्रेसचाच मतदार संघ राहिलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा गढ आहे. आताही मुस्लिम समाज काँग्रेस पक्षालाच मतदान करेल या साठी रावेर लोकसभा काँग्रेसलाच द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान यांनी केली आहे.
याच बरोबर जिल्हा अध्यक्ष अब्दुल हमीद शेख, जामनेर रफीक मौलाना, मलकापुर चे माजी नगर अध्यक्ष रशीद खा जमदार, अॅड मजीद कुरैशी, जिल्हा अध्यक्ष जावेद कुरैशी, रावेर अध्यक्ष सलीम शे., यावल तालुका अध्यक्ष ईकलास सैय्यद, चोपडा अडावदचे जहीर खान, मुक्ताईनगर सचिव यासीन खान, सै कौसर कलीम मेम्बर फैजपुर, जामनेर शहर अध्यक्ष मुसा पिजारी, भुसावल शहर अध्यक्ष सलीम गवळी आदिंनी देखील ही मागणी केली आहे.