रावेरमध्ये रोहिणी खडसेंचा नकार ; आता रक्षा खडसेंविरूद्ध यांच्या नावाची चर्चा, आज होणार निर्णय

मार्च 16, 2024 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात रोहिणी खडसेंनीही लढण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सक्षम उमेदवारांसाठी शोधमोहिम सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवारांची भेट घेत उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. ज्ञानेश्वर बढे यांच्या पत्नी डॉ. तृप्ती बढे यांच्या नावावरही पक्षाने विचार सुरू केला आहे. दरम्यान, आज शनिवारच्या पक्षाच्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

raksha khadse jpg webp

भाजपच्या महिला उमेदवाराच्या विरोधात महिलेलाच रिंगणात उत्तरविल्यास तुल्यबळ लढत होऊ शकते, असा विचार करून शरद पवारांकडून महिला उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक सल्लागार ज्ञानेश्वर बढे यांच्या पत्नी डॉ. तृप्ती बढ़े यांचे नाव शुक्रवारी अचानक पुढे आले. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांनीही शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीसाठी तयारी दाखवली आहे.

जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यापेक्षा हे रावेर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार गट) लेवा समाजातीलच एखाद्या नव्या चेहऱ्याची प्रतिक्षा होती. त्या दृष्टीने चाचपणी दोन दिवसांपासून सुरू होती. शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची बैठक झाली. यावेळी माजी आमदार संतोष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शनिवारी डॉ. तृप्ती बढे या देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now