⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | रावेर भ्रष्टाचार प्रकरण : पुन्हा दोन आरोपींना अटक, संख्या दहावर पोहचली!

रावेर भ्रष्टाचार प्रकरण : पुन्हा दोन आरोपींना अटक, संख्या दहावर पोहचली!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । रावेर पंचायत समितीतील दिड कोटींच्या शौचालय गैरव्यवहार प्रकरणी रावेर पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या दहावर पोहचली आहे. दरम्यान, यापूर्वी अटकेत असलेल्या आठ आरोपींसह नव्याने अटक केलेल्या दोघांना रावेर न्यायालयात हजर केले असता दहा आरोपींना 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सतीश वामनराव पाटील व महेंद्र बिसन गाढे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बहुचर्चित रावेरातील शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात दिवसागणिक आरोपींची संख्या वाढत आहे. सोमवारी दिवसभर येथील गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचा जबाब नोंदवण्यात आला तर सायंकाळी काही बँक अधिकार्‍यांचीदेखील चौकशी तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी केली. दरम्यान, अटकेतील एकूण दहा आरोपींना मंगळवारी रविवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह