रावेर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची घोडदौड, भाजप पिछाडीवर

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । राज्यातील 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होत असून अनेक ठिकाणचे निकाल हाती येत आहेत. दरम्यान, रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. रावेर बाजार समितीत एकूण अठरा जागा आहेत. त्यापैकी प्रारंभी ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीने आठ जागा पटकाविल्या आहेत. तर भाजप शिंदे गट केवळ एका जागेवर विजयी झाले.

हे विजयी झाले?
हमाल मापारी मतदार संघातून सैय्यद असगर सैय्यद तुकडू, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून पाडुरंग शिवदास पाटील, विकास सोसायटी मतदार संघातून सचिन रमेश पाटील,विकास सोसायटी भटक्या विमुक्त मतदार संघातून जयेश रविंद्र कुयटे विजयी झाले आहेत.

भाजप शिंदे गटाला एक जागा मिळाली असून ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदार संघातून सिंकदर तडवी विजयी झाले आहेत. तर इतर चार मतदार संघातही महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.