---Advertisement---
धरणगाव

पाळधीला उद्या साई सेवा समितीतर्फे होणार भव्य रावण दहन!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । घटस्थापनेला उद्या दहा दिवस पूर्ण होत असून सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला पाळधी येथे साई सेवा समितीतर्फे ४० फुटी भव्य रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

WhatsApp Image 2022 10 04 at 9.31.56 PM jpeg webp

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथील श्री साई मंदिर प्रांगणात उद्या दि.५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ४० फुटी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. साई सेवा समितीतर्फे रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, मनपा जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, साई सेवा समितीचे सुनील झंवर, पाळधीचे सरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

---Advertisement---

जळगावात पाळधी येथे भव्य दिव्य रावण दहन कार्यक्रम आयोजनाचे यंदा दहावे वर्ष असून आकर्षक आतिषबाजी देखील केली जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---