---Advertisement---
राशिभविष्य

आजचे राशिभविष्य : १८ एप्रिल २०२१

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । तुमचा आजचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या.

मेष रास

आज आपला आत्मविश्वास वाढेल.धडाडीने कोणतेही कार्य पूर्ण कराल.समोर उभ्या असलेल्या प्रश्नांना सामोरे जाऊन मार्ग करण्याचे धाडस निर्माण होईल.चंद्र राहू कुटुंब स्थानी असल्याने कौटुंबिक वादविवादाची शक्यता राहील. कामाचा ताण राहील.

---Advertisement---

वृषभ रास

ही हौशी लोकांची रास असल्याने हौसमौजेसाठी पैसे खर्च होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामात अडथळे उत्पन्न झाले तरी कठीण परिस्थितीतून मार्ग काढाल.

मिथून रास

लाभेश लाभात जोडीदाराचे सहकार्य प्राप्त होईल. सासरकडून देखील जबाबदारी पार पाडण्याचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबेश व्ययस्थानात कुटुंबासाठी पैसा खर्च होईल. मात्र मानसिक कुचंबणा होईल. पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम.

कर्क रास

व्यक्तीमत्व समृद्ध होईल. सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे सामर्थ्य निर्माण होईल. मित्रांशी वादविवादाची शक्यता दिसून येत असल्याने तुमच्या व्यक्तीमत्वाला अनुसरून शब्द तोलून मापून वापरल्यास परिस्थिती निवळण्यास मदत होईल. संतती स्वतःच्या मर्जीने वागेल. परिस्थिती अनुकूल होईपर्यंत शांततेच्या धोरणाचा अवलंब करावा.

सिंह रास

आपल्या राशीला साजेशी ग्रहस्थिती निर्माण होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढण्याचे तंत्र उपयोगी पडेल. नोकरीत लवकरच वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात भावंडांपासून सुखप्राप्ती. जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

कन्या रास

आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिल्यास यश तुमचेच आहे. धनेश सुखस्थानी शिवाय लाभेश भाग्यात सांपत्तिक स्थिती चांगली राहील.  प्रवासात अडथळे निर्माण होतील. वाहने जपून चालवा.

तुळ रास

कोणत्याही परिस्थितीला आनंदाने सामोरे जाल .व्यवसायात जोडीदाराचे सहकार्य मिळाल्याने दिलासा मिळेल. मानसिक तणावाखाली दिवस जाईल. कोणतेही काम दिरंगाईने होईल.

वृश्चिक रास

व्यक्तीमत्वात धार निर्माण होईल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून आर्थिक लाभ होईल.बहीण भावंडांसाठी पैसा खर्च होईल.

धनु रास

कुटुंबेश व लग्नेश कुटुंबात असल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबात वृध्दी होईल. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. मात्र आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील.

मकर रास

परिस्थितीवर खंबीरपणे मात कराल. विद्याप्राप्तीत अडथळे उद्भवले तरी नंतर यश तुमचेच आहे. संततीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च होतील.प्रकृतीची काळजी घ्यावी.

कुंभ रास

आईचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक खर्च होतील.कुटुंबातील वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत पराक्रम गाजवाल.

मीन रास

नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. जवळचे प्रवास कराल. नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक लाभ होतील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---