शनिवार, डिसेंबर 2, 2023

उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिक श्रावण महिन्याचा ‘या’ पाच राशींना विशेष लाभ..

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । दर तिसऱ्या वर्षी येणारा अधिक मास १८ जुलै पासून सुरु होणार आहे. या अधिक महिन्यात भगवान शंकरासह भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळणार आहे, असे ज्योतिषांकडून सांगण्यात आले आहे. या अधिक महिन्यात पूर्वार्धात सरासरी पेक्षा जास्त पाऊस, तर उत्तरार्धात खंडित पाऊस होणार असल्याचे ज्योतिषांनी वर्तविले आहे.

पावसासोबतच वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, धनू या पाच राशींना या अधिक श्रावण विशेष लाभ मिळणार असल्याचे संकेत ज्योतिषांकडून देण्यात आलेले आहे. श्रावणी सोमवारचे व्रत महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, विष्णू सहस्त्रनाम स्रोत्राचे वाचन करण्याचे देखील पुरोहितांकडून सांगण्यात आलेले आहे.

असे असणार आहे अधिक श्रावण महिन्यातील राशी भविष्य :

मेष : नागरिकांना राहू, केतूच्या संयोगामुळे ताण, चिंता उद्धभवेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : संपूर्ण महिना शुभ, फलदायक आहे. अनेक फायदेशीर संधी चालून येणार आहे.
मिथुन : मेहनतीचे फळ मिळेल. धावपळीतून वेळ काढून कुटुंबाकडे लक्ष द्याल.
कर्क : चंद्र राशीनुसार गुरु दहाव्या भावात संक्रमण करत असल्याने नोकरीमध्ये बदल संभवतील.
सिंह : संधी सहज मिळतील, नोकरीत स्थिरता तसेच कुटुंबात मधुरता आणि भाग्योदयाचा संभव आहे.
कन्या : शनी वक्री अवस्थेत असल्याने कामात विलंब होऊ शकतो. काळजी घ्यावी.
तूळ : जीवनात दिशा बदलण्याचे निर्णय घ्याल. आरोग्य उत्तम तर सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळेल.
वृश्चिक : खर्चाचे नियोजन करावे लागेल. केतू, बृहस्पतीच्या प्रतिकूलतेमुळे कर्जही घ्यावे लागेल.
धनू : नोकरीच्या संधी येतील. व्यवसायात लक्ष केंद्रित केल्यास पैसा आणि यश मिळेल.
मकर : शनीची वक्री स्थिती पैसे कमविण्यात अडथळा ठरू शकते. भविष्याबाबत असुरक्षित वाटू शकते.
कुंभ : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. करिअर मध्ये कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
मीन : नोकरीत अचानक बदलांना सामोरे जावे लागू शकते. नको त्या प्रवासाला जावे लागू शकते.