⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | लग्नाचे आमिष देत नर्स तरुणीवर पाच महिने अत्याचार

लग्नाचे आमिष देत नर्स तरुणीवर पाच महिने अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच लग्नाचे आमिष दाखवत 31 वर्षीय नर्स तरुणीवर पाच महिने अत्याचार करण्यात आला. मात्र नंतर तरुणाने लग्नास नकार दिल्याने पीडीतेने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती शहरातील 31 वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. 14 फेब्रुवारी 2021 रोजी ‘हॅलो यू अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणीची मुक्ताईनगर येथील भूषण संजयराव तायडे (31) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत भूषण तायडे याने तरुणीला 23 एप्रिल 2021 रोजी गाडी पाठवून मुक्ताईनगरात बोलावून घेतले. त्यानंतर एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर पीडीत तरुणीसोबत भूषण तायडे हा त्याच्या घरी आला असता त्याच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला. यामुळे भूषण तायडे आणि पीडित तरुणी हे अमरावती येथे 24 एप्रिल 2021 ते 8 सप्टेंबर 2021 दरम्यान एकाच ठिकाणी राहू लागले. त्यावेळी सुद्धा तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरीक संबंध प्रस्थापित करण्यात आले. यानंतर तरुणीने लग्ना संदर्भात विचारले असता कागदपत्रांचा बहाणा करीत गोष्ट टाळली. त्यानंतर अचानक भूषण तायडे हा तरुणीला काहीही न सांगता 8 सप्टेंबर रोजी रात्री घरातून निघून गेला. दरम्यान पीडिता ही भूषण तायडे याच्या घरी गेली असता भूषणच्या आई-वडीलांनी पिडीतेला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी तरुणीने अमरावती शहरातील फैजरपुरा शहर पोलिस स्टेशनला धाव घेऊन संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.