Tuesday, May 24, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Rape : फोटो मॉर्फिंग करीत तरुणीवर शालेय जीवनापासून ८ वर्ष अत्याचार

crime 1 5
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 26, 2022 | 3:12 pm

सात जणांविरीरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ एप्रिल २०२२ । गेल्या ८ वर्षांपासून एका २२ वर्षीय तरूणीवर सतत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आठ वर्षांपूर्वी पीडितेचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश बाविस्कर याची ओळख त्या मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानुसार तरूणीस आठ वर्षांपुर्वी गाडीवर जबरदस्ती बसवून सोबत रीतेशचा मित्र बंटी आणि राहुल हे देखील होते. इंजिनघाट परिसरात घेऊन तिथे तिच्यासोबत अत्याचार केला. तर बंटी आणि राहुल यांनी अत्याचाराचे फोटो काढले तसेच तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून तिला पुन्हा शाळेजवळ सोडले. त्याचप्रमाणे रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण यांनी मुलीला घरातून पैसे चोरून आणावे असे सांगितले.

सदर प्रकार हा गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू होता. मुलगी २२ वर्षाची झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा लग्नाचा विषय सुरू केला. हा विषय रितेश याला समजल्यानंतर त्याने १९ एप्रिल रोजी तरुणीला कॉलेजमधून गाडीवर बसून घेऊन बिग बाजार येथे जळगावला आणले. या ठिकाणी देखील विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला आणि ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचा आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल’ अशी धमकी दिली.

अखेर छळाला व अत्याचाराला कंटाळून तरुणीने दि २५ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली . त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रितेश बाविस्कर, त्याची आई शोभा बाविस्कर, त्याची बहीण नंदनी राहुल कोळी, त्याचे वडील सुनील बाविस्कर सर्व रा. भुसावळ, मित्र उर्वेश पाटील बंटी आणि राहुल (पुर्ण नावे माहित नाही) अशा ७ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार हे करीत आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
Member R

Member Registration : पाचोरा युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

crime १

शेतातील मक्याला आग, लाखाचे नुकसान

hatnur dam

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा : मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.