---Advertisement---
महाराष्ट्र जळगाव जिल्हा राजकारण

रामदास कदमांनी जळगावात येऊनच दाखवावं, त्यांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे ती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटातील नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी आक्षेपार्ह्य विधान केले आहे. या विरोधात शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाली आहे. जळगावमध्ये रामदास कदम यांनी येऊन दाखवावं त्यांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे ते? असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी रामदास कदम यांना दिला आहे.

vishnu bhangale shivsena jpg webp

रामदास कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य विधाना विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. आज जळगाव जिल्ह्यात सुद्धा शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी धरणगावात तर सायंकाळी जळगाव शहरात शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---Advertisement---

यावेळी शिवसेनेतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जोडे मारो आंदोलन करताना शिवसेनेतर्फे रामदास कदम यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी रामदास कदम यांच करायचं काय? खाली डोकं वरती पाय अशा प्रकारच्या घोषणा शिवसेनेतर्फे देण्यात आल्या. रामदास कदम यांनी जळगावत येऊनच दाखवावं त्यांना दाखवून देऊ शिवसेना काय चीज आहे? अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी रामदास कदम यांना खुलं आव्हान दिलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---