⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | बातम्या | अक्षयचा ‘राम सेतू’ 2022 मधील ठरला सर्वोत्कृष्ट ओपनर चित्रपट, पहिल्या दिवसाची कमाई किती??

अक्षयचा ‘राम सेतू’ 2022 मधील ठरला सर्वोत्कृष्ट ओपनर चित्रपट, पहिल्या दिवसाची कमाई किती??

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीच्या खास मुहूर्तावर अक्षय कुमारने राम सेतू रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काहींनी अक्षयचा चित्रपट सरासरी असल्याचे सांगितले आहे. मात्र, 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आहे.

राम सेतूने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
दिवाळी आणि सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाला खूप फायदा झाला आहे. राम सेतूने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन जवळपास 15 कोटी रुपये आहे. यासह हा चित्रपट अक्षय कुमारचा 2022 मधील सर्वोत्कृष्ट ओपनर चित्रपट ठरला आहे.

अक्षय कुमारचे शेवटचे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकले नाहीत. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. अशा परिस्थितीत अक्षय कुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राम सेतूवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे. आता अक्षयचा हा चित्रपट येत्या काळात बॉक्स ऑफिसवर कितपत हिट ठरतो ते बघू.

अक्षय कुमारचा चित्रपट राम सेतू बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या थँक गॉडशी टक्कर देत आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये राम सेतूने अजय देवगणच्या थँक गॉड चित्रपटाला मागे टाकले आहे. राम सेतूच्या पहिल्या दिवसाची कमाई 15 कोटी असल्याचे सांगितले जाते, तर थान गॉडने केवळ 8-9 कोटींची कमाई केली आहे.

राम सेतूचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करून त्यांनी दुहेरी धमाका केला आहे. अक्षय कुमार राम सेतूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ बनला आहे. चाहतेही अक्षय कुमारच्या अभिनयाचे आणि लूकचे कौतुक करत आहेत. चित्रपटाचे व्हीएफएक्स, कथानक, क्लायमॅक्स… प्रत्येक गोष्टीने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. जर तुम्ही अजून राम सेतू पाहिला नसेल तर क्षणाचाही विलंब न लावता पहा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.