⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगावातील रस्त्यांसाठी थेट मुंबईत बैठक: आमदार भोळे राहणार उपस्थित

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. मात्र यासाठी ना. गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. आज ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त आणि संतप्त झाले आहेत. मात्र यासाठी आधी आलेल्या निधीतून काही प्रमाणात कामे सुरू झालेली असली तरी ती पुरेशी नाहीत. आता खराब झालेल्या रस्त्यांना मोठा निधी लागणार आहे. यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जळगावातील रस्त्यांसाठी या बैठकीत २०० कोटी रूपये इतका मोठा निधी मिळण्याची मागणी करण्यात येणार असून याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.