जळगाव लाईव्ह न्यूज | Rakshabandhan Muhurta | बहीण भावाचे पवित्रनाते आपल्या देशात ज्या सणाला साजरे केले जाते. तो सण म्हणजे रक्षा बंधन. येन बद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल| तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल|’ या मंत्राचा जाप करत बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. या वर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षा बंधन साजरे केले जाणार आहे. बहीण भावाचे पूजन व टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीच्या सुख-दु:खात जीवनभर साथ देण्याची शपथ घेऊन बहिणीला भेटवस्तू देतो. हे पर्व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मनवण्यात येते. या पर्वाला राखी पौर्णिमा असे म्हटले जाते. ११ ऑगस्टला भद्रा असला तरी दुपारी १ वाजेपर्यंत राखी बांधता येईल. ही वेळ शुभ आहे.
‘येन बद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल| तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल|’ या मंत्राचा जाप करत बहिणीने भावाला राखी बांधायची आहे. यंदा रक्षाबंधन पर्व ११ ऑगस्टला साजरे करायचे की १२ राेजी याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. ११ ऑगस्टला सकाळी १०.३९ ते रात्री ८.५२पर्यंत भद्रा काळ आहे. शास्त्रानुसार रक्षाबंधनपर्व भद्रारहित झाले पाहिजे. श्रावण पौर्णिमा तिथीदेखील ११ ऑगस्टला सकाळी १०.३९पासून सुरू होत आहे. पौर्णिमा लागल्यापासून भद्राकाळही सुरू होताे आहे. तर १२ ऑगस्टला सकाळी ७.०६ वाजेपर्यंत पौर्णिमा राहणार आहे. त्यामुळे बहिणीला भावाच्या हातावर रक्षासूत्र हे ११ ऑगस्टला भद्रा काळ संपल्यावर बांधायचे की १२ ऑगस्टला उगवणाऱ्या तिथीला बांधायचे याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र, भद्रा संपल्यानंतर ११ ऑगस्टला रात्री ८.५२ नंतर राखी बांधली गेली पाहिजे. १२ ऑगस्टला पौर्णिमाही सकाळी ७.०६ वाजेपर्यंत आहे. हा मुहूर्त सूर्योदयापेक्षा तीन मुहूर्त कमी असल्याने या दिवशी रक्षाबंधन शास्त्रानुसार नाही.
उगवणाऱ्या तिथीला पौर्णिमा असल्याने श्रावण महिन्यातील कर्मकांड हे १२ ऑगस्टला करणे उचित होणार आहे. या काळात सत्यनारायण व्रत, जीवंतिका पूजन, संस्कृत दिवस आणि लक्ष्मी व्रत आदी कर्मकांड करता येणार आहेत. यंदा ११ ऑगस्टला भद्रा संपल्यानंतर प्रदोष काळात पौर्णिमा उपलब्ध आहे. तर १२ ऑगस्टला उगवणारी पौर्णिमा सूर्योदयात तीन मुहूर्तांपेक्षा कमी वेळासाठी आहे. या दिवशी रक्षासूत्र बांधणे शास्त्रसंमत नाही. त्यामुळे ११ ऑगस्टला सकाळी १ वाजेपर्यंत व रात्री ८.५२ वाजेनंतर राखी बांधणे उचित होणार आहे.
लक्ष्मण जोशी गुरुजी, कालिकामाता नगर, जळगाव