---Advertisement---
जळगाव जिल्हा

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाबाबत खा. रक्षा खडसेंचं नितीन गडकरींना निवेदन! केली ‘ही’ मागणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२३ । तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर – अंकलेश्वर (Berhanpur – Ankleshwar Highway) राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले असून,चौपदरीकरणासाठी डीपीआर तयार होऊन जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात येऊन रावेर व सावदा शहरास चौपदरीकरणामध्ये वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे

nivedan raksha khadse jpg webp

याच दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेतली. बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच म्हणजे रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, अशी मागणी यावेळी रक्षा खडसेंनी केली असून त्यासंदर्भात निवेदन दिले.

---Advertisement---

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा – शिरपूर – चोपडा – यावल – फैजपूर – सावदा – रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे अशी मागणी खा. खडसेंनी भेट घेऊन केली.

मागील वर्षी सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आलेले असून, सध्या देखभाल दुरुस्तीसाठी रु.६१.०० कोटी निधी वितरीत करण्यात आलेला असून, चौपदरीकरणसाठी डीपीआर तयार होऊन, जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे मार्फत ७ डिसेंबर रोजी आदेश देण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---