नाथाभाऊंनी भाजपात यावं ही.. ; रक्षा खडसेंच्या सूचक वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

फेब्रुवारी 22, 2024 5:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता याच चर्चेदरम्यान एकनाथ खडसे यांच्या सून भाजपच्या (BJP) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी सूचक विधान केलं असून यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

raksha khadse jpg webp

काय म्हणाल्या रक्षा खडसे?
एकनाथ खडसेंनी भाजप यावं ही आपली ही व सर्वांची इच्छा असल्याचे मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसात अनेक मोठे नेते पक्षात प्रवेश करत असून एकनाथ खडसे यांनीही भाजप यावं ही सर्वांची इच्छा असल्याचे सूचक विधान ही खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now