एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर आता रक्षा खडसेंचा घुमजाव ; म्हणाल्या मी..

फेब्रुवारी 26, 2024 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 फेब्रुवारी 2024 | एकनाथ खडसे भाजपात येणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांच्या सून असलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील खडसे भाजपात यावे, असे मत व्यक्त केले होते. मात्र आता खासदार रक्षा खडसे यांनी घुमजाव करत एकनाथ खडसे हे भाजपात यावे, असे आवाहन मी केले नसल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

raksha khadse jpg webp

सावता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटना प्रसंगी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी नाथाभाऊ खडसे हे भाजपात यावे असे आवाहन मी केले नाही. मला पत्रकारांनी विचारले की एकनाथ खडसे हे भाजप पक्षात यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जी इच्छा कार्यकर्त्यांची आहे, तीच माझी असल्याचे मी सांगितले होते.

मी प्रश्नाला उत्तर दिले मात्र माझ्या शब्दाचा विपरीत अर्थ काढला गेला. मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे हे दोघे मोठे नेते आहेत, मी त्यांच्यामध्ये पडणे उचित होणार नसल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

दरम्यान,रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर दोन दिवसापूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसेंनी पक्षात यावं, गल्लीबोळीतील लोक म्हणत असतील त्याला अर्थ नाही एकनाथ खडसे कशा परिस्थितीत पक्ष सोडून गेले हे पक्ष नेतृत्वलाही वाटलं पाहिजे त्यामुळे पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन एकनाथ खडसेंनी भाजप यावं असं महाजन म्हणाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now