⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रस्त्याचा बाप ठरताच राजुमामांनी १० कोटींचा निधी मिळवला

रस्त्याचा बाप ठरताच राजुमामांनी १० कोटींचा निधी मिळवला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. पर्यायी या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.

गेल्या वर्षभरापासून जर जळगाव शहरातला सर्वात खराब रस्ता कोणता? असा प्रश्न जळगाव शहरातील नागरिकांना विचारला तर नागरिक म्हणायचे तो म्हणजे इच्छादेवी चौकातला रस्ता. मात्र आता जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी हा रस्ता पूर्ण व्हावा या अनुषंगाने दहा कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. यामुळे आता नागरिकांची गैरसोय लवकरच टळणार आहे. या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

याबाबत आमदार राजू मामा भोळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, इच्छा देवीचा रस्ता खूपच खराब होता. नागरिकांचा मोठा रोष या रस्त्याबाबत होता. यामुळे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करणे अतिशय गरजेचं होतं. त्या अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील त्वरित या निधीला मंजूरी दिली यासाठी त्यांचे आभार. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता बनवायला हवा अशी अपेक्षा यावेळी आमदार भोळे यांनी व्यक्त केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह