राज ठाकरेंची तोफ कडाडणार : पुण्यातील सभेची तारीख जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ लवकरच पुण्यात कडाडणार आहे. राज यांची सभा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे २२ मे रोजी होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरात हि सभा असणार आहे. सायंकाळी ७ वाजता सभा होणार आल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा होणार असल्याने या सभेकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.आधी हि सभा २१ मे रोजी नदीपात्रात आयोजन करण्यात आली होती. पण पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचं नियोजन बदलून आता ती सभा रविवारी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच इथे होणार आहे.
राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासह अयोध्येतील निवडक साधू संतांनी विरोध केला आहे. बृजभूषण सिंह तर विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र करत आहेत. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यातील सभेत रोखठोकपणे भाष्य करण्याची शक्यता आहे.