रायसोनीच्या विद्यार्थांनी बनविले “ऑटोमेटिक कारचा जॅक
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । रायसोनीच्या विद्यार्थांनी बनविले “ऑटोमेटिक कारचा जॅक न लावता काढता येणार पंक्चर ; वेळेची व श्रमाची होणार बचत जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षाचे विध्यार्थी ललित पाटील, सागर महाजन यांनी या समस्येवर उपाय शोधत स्वनिर्मित केलेल्या मॉडेलचे पेटंट प्रकाशित झाले आहे.
विध्यार्थ्यानी ऑटोमोबाईलसाठी निर्मिती केलेले हे कॉम्पॅक्ट हायड्रॉलिक लिफ्ट यंत्रणा कारच्या चेसीसमध्ये फिट केले जाईल. हायड्रॉलिक जॅक ही एक प्रकारची भार उचलणारी यंत्रणा आहे, जी ऑपरेट केली जाते हायड्रॉलिक बलाने. या यंत्रणेत सिलिंडर व सेंटर पिन कॉम्पॅक्ट हायड्रॉलिक चा समावेश आहे. सेडान कार किंवा एसयूव्ही अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा शोध उपयुक्त ठरेल. या जॅक सिस्टमचे नियंत्रण ड्रायव्हर्सच्या केबिनमध्ये स्थित करण्यात येईल, चिखल किंवा खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर खेचण्यास देखील हि यंत्रणा पूर्णपणे मदत करेल. हा शोध कोणत्याही प्रकारच्या कारमध्ये सहजपणे ऑक्सेसरी म्हणून बसवता येणार आहे.
अशी मिळाली प्रेरणा
यामागचा विशिष्ट हेतू सांगताना विध्यार्थी म्हणाले की, त्यांनी एकदा एका अनोळखी रस्त्यावर एका वयोवृद्ध व्यक्तीला मोठ्या कसरतीने पंक्चर झालेल्या कारचे टायर बदलतांना पहिले यावेळी त्याच्या भल्यामोठ्या कारचे पंक्चर झालेले टायर जॅकच्या सहाय्याने काढताना त्यांची होणारी दमछाक पाहून त्यांनी तातडीने त्यांना मदत करण्याचे ठरवले व टायर बदलून दिले पण अशा परिस्थितीत या वयोवृद्ध व्यक्तीचे झालेले हाल पाहून विध्यार्थ्यानी “ऑटोमेटिक कॉम्पॅक्ट जॅक” असे उपकरण बनवण्याची योजना आखली जी कुठल्याही व्यक्तीचा स्मार्ट साथीदार बनून त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगातून त्यांना कमी वेळेत व कमी श्रमात यातून बाहेर काढेल व त्यांचा प्रवास सुखकर करेल. या अनुषगाने त्यांनी आपली भावना मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांना बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन सदर मॉडेल विकसित करत त्यांचे पेटंट दाखल केले.
संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक
विध्यार्थ्यानी नवनिर्मित केलेल्या “ऑटोमेटिक कॉम्पॅक्ट जॅक” बद्दल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री प्रितम रायसोनी यांनी या मॉडेलचे पेटंटधारक व महाविद्यालयातील विध्यार्थी ललित पाटील व सागर महाजन यांचे कौतुक करत “विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची कर्तुत्ववान होण्याची चावी सापडली जी त्यांनी उत्कृष्ट सेवा घडवण्यासाठी वापरावी.” असे मार्गदर्शन केले. तर संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पुढील आयुष्यातील उज्वल भविष्यासाठी या विध्यार्थ्यांना शुभ संदेश दिला यावेळी अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे देखील उपस्थित होते.