⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांना मुसळधारची प्रतीक्षा ; जिल्ह्यात या तारखेला जोरदार पावसाची शक्यता..

जळगावकरांना मुसळधारची प्रतीक्षा ; जिल्ह्यात या तारखेला जोरदार पावसाची शक्यता..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । जून महिन्याचे २० दिवस उलटले तरी देखील जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहेत. त्यातही काही ठिकाणी मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. मात्र मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. परंतु पुन्हा पावसाला सुरूवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. जळगावातही आजपासून २३ जून पर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात आज कुठे कोसळणार पाऊस?
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काल देखील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशी, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तर उत्तर महाराष्ट्राला अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

जळगावकरांना मुसळधारची प्रतीक्षा
जळगावात अजूनही मान्सून सक्रिय झालेला नसल्यामुळे धुवाधार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आज २० ते २३ जून दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. २४ व २५ जूनला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून ढगांची वर्दळ वाढली आहे. जळगाव शहरात बुधवारी दुपारपर्यंत उन्हाचा तडाका सुरू होता तर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला होता. ५ वाजेनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते; परंतु उकाडा अजूनही कायम आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.