---Advertisement---
जळगाव जिल्हा

चिंतेचे ढग! जळगावातील 23 महसूल मंडळांमध्ये केवळ ‘इतके’ टक्के पाऊस

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात धो-धो पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे चिंतेचे ढग वाढले आहेत.

rain farmer jpg webp webp

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सर्वाधिक पाऊस हा ऑगस्ट महिन्यात होत असतो. मात्र, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असून केवळ ४८ मिलिमीटर पाऊस झालाआहे. या महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल ७५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यात २३ महसूल मंडळांमध्ये तर २० टक्के पावसाचीही नोंद झालेली नाही.

---Advertisement---

त्यामुळे पावसाअभावी खरिपाची पिके करपू लागली असून यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान, आता सप्टेंबर महिन्यात देखील परतीच्या पावसाने जर पाठ दाखवली तर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण ४९० मिलिमीटर सरासरी पाऊस होतो. मात्र, त्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत ३४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यातही एकट्या जुलै महिन्यात तब्बल २४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर जून व ऑगस्ट या दोन महिन्यांत केवळ ९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, सरासरीपर्यंत पाऊस होण्याची सध्यातरी शक्यता कमी आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत सप्टेंबर महिन्यात महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाला तर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पावसाअभावी धरणगाव, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव या तालुक्यांमधील अनेक महसूल मंडळातील पिकांना फटका बसत आहे.

या मंडळात २० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद
जिल्ह्यात एकूण ८६ महसूल मंडळे आहेत. एकाही महसूल मंडळात ऑगस्ट महिन्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील २३ महसूल मंडळांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद नाही. त्यामध्ये जळगाव तालुक्यातील भोकर, यावल तालुक्यातील फैजपूर, भालोद, बामनोद, रावेर तालुक्यातील खिर्डी, निंभोरा, मुक्ताईनगरातील घोडसगाव, अमळनेर तालुक्यातील शिरुड, पातोंडा, मारवड, नगाव, अमळगाव, भरवस, चोपडा तालुक्यातील गोरगावले, लासूर, चहार्डी, एरंडोल तालुक्यातील शेळवे, चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव, शिरसगाव, मेहुणबारे, हातले, तळेगाव, खडकी, पाचोरा तालुक्यातील वरखेडी. भडगाव तालुक्यातील भडगाव, कजगाव, कोळगाव, धरणगाव तालुक्यातील सोनवद या महसूल मंडळांचा समावेश आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---