वाणिज्य

आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर ; वाचा प्रति लिटरचा नवा दर

जळगाव लाईव्ह न्यूज ।०६ नोव्हेंबर २०२१ । केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडूनही नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी देशातील तीन मोठ्या सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

petrol diesel

जळगाव शहरात शहरात पेट्राेल ५ रुपये ८२ पैशांनी तर डिझेल १२ रुपये १६ पैशांनी घसरले. यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इंधनाच्या दरात आणखी घट हाेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या दाेन महिन्यांपूर्वी शंभरी गाठलेल्या पेट्राेलचे दर बुधवारी रात्रीपर्यंत ११७ रुपये ११ पैसे तर डिझेलचे दर १०६ रुपये १८ पैसे हाेते. त्यात केंद्र शासनाने अबकारी शुल्क घटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंधनाचे दर कमी हाेणार असल्याने वाहनधारक काहीअंशी का असेना पण समाधानी आहेत. केंद्र शासनाच्या घाेषणेप्रमाणे गुरुवारी सकाळी पेट्राेल पंपांवर नवीन दरानुसार विक्री सुरू झाली. पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर विक्री झाले.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button