⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

परतीचा पाऊस थैमान घालणार? जळगाव जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । राज्यात पावसाने उसंती घेतल्याने उकाडा वाढला आहे. मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या देशात परतीच्या पावसाची चाहूल लागली असली असून त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. सध्या काही दिवसापासून पावसाचे विश्रांती घेतली असली तरी उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.29) गुरुवारी राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तविली आहे.

आज ‘या’ भागांना इशारा?
कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याला पुढील दोन दिवस गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.