शेतकऱ्यांनो काळजी घ्या.. पुढचे ३ दिवस जळगाव जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’

सप्टेंबर 12, 2022 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । अनेक दिवसाच्या खंडानंतर पावसाने पुन्हा एकदा राज्यात थैमान घालायला सुरूवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Rain Alert In Jalgaon

rain jpg webp

जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. मागील गेल्या तीन आठवड्यापासून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता. मात्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गणेश विसर्जन पासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.

कालपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून आला असून पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रविवारी सुमारास जळगाव शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. पुढचे तीन दिवस जिल्ह्यात आणखी दमदार पावसाची शक्यता आहे.

जळगांव जिल्हा पाऊस
दि12/ 9/2022
अमळनेर-27
बोदवड-
भडगाव-12
भुसावळ-27.2
पाचोरा-22
पारोळा-11
जामनेर-22
चोपडा-16
चाळीसगाव-
रावेर-36
मुक्ताईनगर-30
धरणगाव-20
यावल-44
एरंडोल-19
जळगाव-29.2

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now