---Advertisement---
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या.. हवामान खात्याकडून पावसाबाबत महत्वाचा अलर्ट, आज कुठे बरसणार?

rain
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । सुरुवातीला ओढ दिलेला पाऊस आता अखेरीस राज्यातील अनेक भागात धुमाकूळ घालत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झालीय. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.

rain

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

---Advertisement---

या जिल्ह्यांना अलर्ट
आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, लातूर, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, परभणी, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर जालना, बीड, परभणी, जिल्ह्यात धुव्वाधार पावसाचा अंदाज आहे. तर हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे काहींच्या घरात पाणी शिरले. दरम्यानं पावसामुळे जळगाव शरहातील मेहरूण तलावाची जलपातळी तीन फुटांनी वाढली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---