⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगावसह राज्यात पावसाची पुन्हा उघडदीप : आता कधी परतानार पाऊस? IMD महत्वाचा अंदाज वाचाच..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । महिन्याभराच्या विश्रांती नंतर कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली होती. तीन चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखवाला होता. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांनाही नवीन संजीवानी मिळाली. मात्र राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच पावसाने उघडीप दिली असून ऊन, सावल्यांचा खेळ सुरू आहे. आता पुढील दोन दिवस हवामानाची परिस्थिती अशीच राहणार आहे.

त्यामुळे पाऊस कधी परतेल याची प्रतीक्षा सर्वजन करत आहे. अशातच पावसाबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली. राज्यात आता गुरुवार १४ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे राज्यात गुरुवारपासून मुसळधार पावसाचे संकेत दिले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात गुरुवारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या कुठे हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिलेला नाही.

मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आता गुरुवार १४ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे.

खान्देशात या तारखेनंतर पावसाची शक्यता
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गुरुवारपासून ते रविवारपर्यंत १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खान्देशातील जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आगामी काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर १७ सप्टेंबरनंतर काही प्रमाणात पुन्हा पावसाची शक्यता आहे.