जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । कोळशाच्या कमतरतेमुळे देशात निर्माण झालेल्या वीज संकटावर मात करण्यासाठी भारतीय रेल्वे आणखी काही गाड्या रद्द केल्या आहे. रेल्वेने ४२ गाड्या रद्द केल्या असून या गाड्या २४ मे पर्यंत रद्द राहतील, त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत या गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला जाईल. या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे प्रवास करण्याआधी रेल्वेने रद्द केलेल्या गाड्या तपासून घ्या..
याआधीही रेल्वेकडून सुमारे ११०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये मेल एक्सप्रेसच्या 500 फेऱ्या आणि पॅसेंजर ट्रेनच्या 580 फेऱ्या रद्द राहतील. रद्द झालेल्या गाड्यांपैकी 34 ट्रेन SECR झोनला आणि 8 ट्रेन उत्तरेकडील झोनला जोडल्या गेल्या आहेत. यापूर्वी रेल्वेने गाड्यांच्या सुमारे 650 फेऱ्या रद्द केल्या होत्या. वीज संकट असेच सुरू राहिल्यास कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी आणखी गाड्या रद्द करून वाहतुकीसाठी वापरल्या जातील, असे मानले जात आहे.
दरम्यान, आता रेल्वेने ४२ गाड्या रद्द केल्या आहे. त्यात भुसावळ विभागातून रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालीलप्रमाणे
१२८८० – भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस
१२८७९ – लोकमान्य टिळक भुवनेश्वर
२२८६६ – पुरी लोकमान्य टिळक एक्सप्रेस
१२८६५- लोकमान्य टिळक पुरी
१२८१२ – हातिया लोकमान्य टिळक एक्सप्रेस
१२८११ – लोकमान्य टिळक हातिया
२२८४८ – विशाखा पट्टणम लोकमान्य टिळक एक्सप्रेस
२२८४७ – लोकमान्य टिळक विशाखा पट्टणम
सध्या देशात कोळसा संकट सुरू आहे. आजकाल देशातील अनेक पॉवर प्लांटमध्ये वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत खाणीतून कोळसा भरून लवकरात लवकर वीज केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रेल्वेने घेतली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या इंजिनमध्ये कोळसा वाहून नेणाऱ्या स्पेस वॅगन्स जोडल्या जात आहेत आणि पॉवर स्टेशनवर पाठवल्या जात आहेत. वीज प्रकल्पांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून दररोज सरासरी 28,470 वॅगन्स कोळशाचे लोड केले जात आहे
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज