⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | पिस्तूल लायसन्सच्या नावाखाली रेल्वे कॉन्ट्रॅक्टरला लाखो रुपयात फसवणूक

पिस्तूल लायसन्सच्या नावाखाली रेल्वे कॉन्ट्रॅक्टरला लाखो रुपयात फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । सध्याच्या काळात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच जळगावमधून फसवणुकीची घटना समोर आलीय. पिस्तूलचे लायसन्स काढून देतो असे सांगून रेल्वे कॉन्ट्रॅक्टरची सव्वा नऊ लाखात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरच्या फिर्यादीवरून शाहूनगरातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतापसिंग लक्ष्मणसिंग शेखावत (रा. रेल्वे कॉलनी, अमळनेर, ह. मु. अयोध्यानगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे.

रेल्वे कॉन्ट्रॅक्टर प्रतापसिंग शेखावत यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी अमळनेर पोलिस स्टेशनकडे पिस्तूलच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, २०२१ मध्ये आव्हाने रोडवरील उड्डाण पुलाचे काम सुरु असताना शेखावत यांची ओळख राजेंद्र सुळ (रा. शाहूनगर, जळगाव) यांच्याशी झाली. सुळ यांनी, शेखावतांना अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याचे सांगत पिस्तूलचे लायसन्स काढून देण्यासाठी २१ ऑगस्ट २०२२ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान वेळोवेळी तब्बल ९ लाख २६ हजार ६६३ रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे शेखावत यांच्या लक्षात आले. पैसे परत मागितले असता सूळ यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शेखावत यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी राजेंद्र सूळ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.