आता कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय ; वाचून व्हाल खुश..
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । देशातील बरेच लोक भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक विविध पाऊल उचलले आहे. आता अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ऐकून तुम्हीही खुश व्हाल. ती नेमकी काय आहे जाणून घेऊयात..
ट्रेनमधील बर्थ आणि कन्फर्म तिकिटांची कमतरता दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे मोठी तयारी करत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वे तिकीट देण्याची क्षमता 25,000 वरून 2.25 लाख प्रति मिनिट आणि चौकशी क्षमता 4 लाखांवरून 40 लाख प्रति मिनिट करण्याचा विचार करत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत असेही सांगितले की 2023 ते 24 दरम्यान रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करेल. “तिकीट जारी करणं आणि चौकशीला उपलब्ध राहणं या दोन्हीसाठी 10 पटीनं क्षमता वाढवण्याचं आमचं लक्ष्य आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षात 7,000 किमीचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वर्षी सप्टेंबरपर्यंत, संपूर्ण बॅकएंड प्रणाली अपग्रेड केली जाईल. प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची क्षमतादेखील प्रतिमिनिट चार लाखांहून 40 लाखांपर्यंत अपग्रेड केली जाईल,” असं वैष्णव यांनी सांगितलं. आम्ही प्रवासी आरक्षण प्रणालीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची योजना आखत आहोत. सध्या प्रति मिनिट सुमारे 25,000 तिकिटे काढण्याची क्षमता आहे. हे दर मिनिटाला 2.25 लाख तिकिटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. वैष्णव पुढे म्हणाले, “चौकशीची क्षमता 4 लाख प्रति मिनिट वरून 40 लाख प्रति मिनिट केली जाईल.” देशातील 2,000 रेल्वे स्थानकांवर 24 तास ‘जन सुविधा’ स्टोअर्स सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
७ किमीपर्यंत नवीन ट्रॅक टाकण्यात येणार आहेत
2019 मध्ये, प्रवासी आरक्षण प्रणालीवरील रेल्वेच्या स्थायी समितीच्या 8 व्या अहवालात IRCTC वेबसाइट अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती अपग्रेड करण्याची शिफारस केली आहे. 5 मार्च 2020 रोजी देशात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एका मिनिटात 26,458 तिकिटांचे विक्रमी बुकिंग झाले. या काळात कोट्यवधी लोक शहरांमधून घरी परतण्याच्या शोधात होते.
ते म्हणाले की 2022-23 मध्ये 4,500 किमी (दररोज 12 किमी) अंतरासाठी रेल्वे ट्रॅक टाकण्याचे लक्ष्य आधीच गाठले गेले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 2014 पूर्वी हा आकडा दररोज 4 किलोमीटर होता. रेल्वेने पुढील वर्षी ७ हजार किलोमीटर अंतराचे नवीन रेल्वे रुळ टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.