जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. साउथ ईस्टर्न रेल्वे कोलकत्ता येथे भरती जाहीर करण्यात आलीय. अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती होणार असून १७८५ जागा रिक्त आहे.

या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. rrcser.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १८ नोव्हेंबरपासून सुरु झाली असून इच्छुक उमेदवार १७ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतो. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आवश्यक पात्रता :
रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी rrcser.co.in वेबसाइटवर जावे.
यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर रजिस्टर बटणवर क्लिक करुन तुमची सर्व माहिती भरा.
यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करा अर्ज पू्र्ण भरा.
यानंतर अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.






