⁠ 

Railway Bharti : 10वीसह ITI पास आहात? मग रेल्वेत सुरूय 7914 जागांसाठी मेगाभरती ; लगेचच अर्ज करा

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ। दहावीसह आयटीआय पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची संधी चालून आलीय. दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) च्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 7914 रिक्त जागा भरल्या जातील. Railway Bharti 2023

रिक्त जागा तपशील
दक्षिण मध्य रेल्वे – 4103 पदे
दक्षिण पूर्व रेल्वे – 2026 पदे
उत्तर पश्चिम रेल्वे -1785 पदे

उमेदवारांना त्यांचा अर्ज सबमिट करण्यापूर्वी RRC SCR अधिसूचना, RRC NWR अधिसूचना आणि RRC SER अधिसूचना द्वारे जाण्याचा सल्ला दिला जातो. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 24 वर्षे असावी.

शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असावा

अर्ज कसा करावा?
संबंधित रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वेबसाइटला भेट द्या.
रिक्रूटमेंट टॅबखाली दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
आता, अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
तुमचा अर्ज सबमिट करा.

भरती अधिसूचना 2023

SCR Apprentice Notification

SCR Apprentice Online Application Link

SER Apprentice Notification

SER Apprentice Online Application Link

NWR Apprentice Notification