⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या : रेल्वे प्रशासनाकडून ‘या’ ३० गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२१ ।  प्रवाशांची होणारी गर्दी लक्ष्यात घेता रेल्वे विभागाने काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ केली आहे. तब्बल ३० गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ केली आहे. 

या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ

०२१०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनऊ जंक्शन विशेष ही गाडी ३ जुलैपासून ३० ऑक्टोबरपर्यंत. तर ०२१०८ लखनऊ जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ४ जुलै ते ३१ ऑक्टोबर, ०२१६५ लो. टि. टर्मिनस- गोरखपूर विशेष १ जुलै ते २८ ऑक्टोबर, ०२१६६ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष २ जुलैपासून २९ ऑक्टोबर, ०१०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष ही गाडी ८ जुलैपासून २८ ऑक्टोबर, ०१०८० गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष १० जुलैपासून ३० ऑक्टोबर, ०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष २ जुलैपासून ३० ऑक्टोबर, ०२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ४ जुलै पासून १ नोव्हेंबरपर्यंत.

याचबरोबर ०१०३३ पुणे-दरभंगा विशेष ७ जुलैपासून २७ ऑक्टोबर, ०१०३४ दरभंगा-पुणे विशेष ९ जुलैपासून २९ ऑक्टोबर, ०१४०७ पुणे- लखनऊ जंक्शन विशेष ६ जुलैपासून २६ आक्टोबर, ०१४०८ लखनऊ जंक्शन-पुणे विशेष ८ जुलैपासून २८ ऑक्टोबर, ०१११५ पुणे-गोरखपूर ८ जुलैपासून २८ ऑक्टोबर, ०१११६ गोरखपूर-पुणे १० जुलैपासून ३० ऑक्टोबर, ०२१३५ पुणे-मंडुआडीह विशेष ५ जुलैपासून २५ ऑक्टोबर, ०२१३६ मांडुआडीह – पुणे विशेष ७ जुलैपासून २७ ऑक्टोबरपर्यंत.

अन्य विशेष रेल्वेगाड्यांचाही समावेश

०९२७१ बांद्रा टर्मिनस -पटना, ०२९१३ बांद्रा टर्मिनस -सहरसा, सहरसा-बांद्रा टर्मिनस विशेष, ओखा-हावडा विशेष, ०९२०५पोरबंदर-हावडा विशेष, ०९०५७ उधना-मंडुआडीह या सर्व गाड्यांना अपडाऊनमध्ये मुदत वाढ करण्यात आलेली आहे.