⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | ॲड.पियुष पाटलांच्या तक्रारीची दखल ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर छापेमारी

ॲड.पियुष पाटलांच्या तक्रारीची दखल ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर छापेमारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । ॲड.पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर अप्पर जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अनिल माणिकराव, सो बा मुळे व औषध निरीक्षक यांनी छापा टाकला आहे. या छापेमारीत मोठे घबाड आढळून आल्याचे समोर येत आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
ॲड.पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी दि१० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली होती. त्या तक्रारीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी लॅब येथे रुग्णाच्या शरीरावरील गाठीचे निदान होण्यासाठीचे किट हे जुलै २०२२ पासुन एक्सपायर असून गेल्यावर्षभरापासून सदर किट द्वारेच रुग्णांच्या गाठीचे निदान केले जात आहे व रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे असं म्हटले होते.

प्रथमदर्शनी १० किट (१ का किट मध्ये २५० किट मधे प्रि एजंट/ किट सॅम्पल २५०×१०=२५००) रुग्णांच्या गाठीचे निदान करण्यासाठी हे वापरण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

या सोबतच इतर विविध गंभीर आजारा वरील औषधी देखील एक्सपायर वापरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच कोविड काळातील महत्त्वपूर्ण औषधी देखील एक्सपायर वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सदर एक्सपायर औषधी ह्या तीन महिन्याच्या आत दिस्पोस/ नष्ट करणे गरजेचे असताना देखील हे चालू स्टॉक मध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.