जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । जळगावमधील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हात भट्टीची दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर आज बुधवारी पहाटे ५ वाजता धाड टाकण्यात आली. या धाडीत १ लाख ३२ हजार ५०० रुपयाच्या किंमतीचे गावठी दारू बनविण्याचे रसायन तसेच हात भट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, आज बुधवारी पहाटे ५ वाजेला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सिंगापूर, कंजरवाडा, जाखनी नगर कंजरवाडा येथे अवैध गावठी हात भट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज पहाटे याठिकाणी धाड टाकून यात राखी राजू गुमाने, रेखा सूर्यभान कंजर, आशा सुनील बाटूगे, रीना धर्म गुमाने, बिजनाबाई राजू बाटूगे सर्व रा.जाखनी नगर जळगाव, यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील १ लाख ३२ हजार ५०० रुपयाच्या किंमतीचे गावठी दारू बनविण्याचे रसायन तसेच हात भट्टीची दारू नष्ट केले.
यांनी केली कारवाई
सदरील कारवाई ही पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सपोनि अमोल मोरे, पो.उप निरीक्षक विशाल वाठोरे, रामकृष पाटील, स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, पोहेका राजेंद्र सैदाणे, पोना गणेश शिरसाळे, पोक.सिद्धेश्वर लटपटे, नामदेव पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, किशोर पाटील, सतीश गर्जे, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, म.पो.ना.निलोफर सैय्यद, राजश्री बाविस्कर, आशा पांचाल व होमगार्ड स्टाफ अशांनी केली आहे.